गुरुवर्य ल. ग. देशपांडे पुरस्कार वितरण सोहळा

शनिवार दि. २७ ऑक्टोबर २०१८ रोजी श्री गोपाळ हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे सायंकाळी ठीक ५.०० वाजता गुरुवर्य ल. ग. देशपांडे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार स्व-रूपवर्धिनीचे कार्यवाह मा. श्री . ज्ञानेश पुरंदरे (ज्ञापू ) यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास विद्या – वाचस्पती मा. गिरीशराव बापट (संचालक – ज्ञानप्रबोधिनी, पुणे ) हे अध्यक्ष होते. त्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला . यावर्षीचा हा २० वा पुरस्कार असून याचे स्वरूप पुढीलप्रमाणे – शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोख रक्कम ११,००० रु. व स्मृतिचिन्ह.

या कार्यक्रमात मनोगत मांडत असताना पुरस्काराचे मानकरी श्री . ज्ञानेश पुरंदरे (ज्ञापू ) यांनी हा पुरस्कार आपला नव्हे तर स्व-रूपवर्धिनीच्या सर्व कार्यकर्त्यांचा व कार्यवाह या पदाचा सन्मान आहे असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. उत्तम सहवासातून सर्वोत्तम शिक्षण आणि चारित्र्य घडविणारे संस्कार म्हणजेच ‘सहवासातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कार ‘ हा मूलमंत्र त्यांनी दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गिरीशराव बापट यांनी ज्ञानेशजींचे अभिनंदन करत उपस्थित वर्गाला स्वार्थाकडून निस्वर्थतेकडे व प्रेयसाकडून श्रेयसाकडे वाटचाल कशी करायची हे सांगितले त्याचप्रमाणे ज्ञान हे बंद खोलीतून समाजाभिमुख व्हावे अशी आशा व्यक्त केली. आणि ल. ग. देशपांडे व . ज्ञानेश पुरंदरे यांच्यासारखे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.

सदरच्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत ल. ग. देशपांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.जगदीश देशपांडे, उपाध्यक्ष मा.श्री.विठ्ठल कुलकर्णी, कार्यवाह मा.श्री.राजाराम मोघे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष व पुरस्कार सन्मानित यांचा परिचय प्रतिष्ठानचे कार्यवाह मा.श्री.राजाराम मोघे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता कुलकर्णी यांनी केले तर सौ. तेजस्विनी राजपूत यांनी आभार मानले.